विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे रात्री पासून नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची आणि स्थानिक पोलीसांची एक तुकडी येथे बंदोबस्तात होती. तर, नेहमी गजबजलेले चित्र दिसून ते असलेल्या त्यांच्या निवास्थानाबाहेर शुकशुकाट दिसून आला. तर, दुसरीकडे टेंभी नाक्यावरील आनंद मठाच्या ठिकाणी देखील सकाळ पासून शुकशुकाट दिसून आला.